कोवाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन:
कोवाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन:

कोवाड.
कोवाड, येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न प्रमुख वक्ते डॉ.सुनिता कांबळे होत्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ व्ही आर पाटील होते.
प्रमुख वक्ते डॉ.सुनीता कांबळे म्हणाल्या,
आजच्या काळात सावित्रीबाई फुले यांचे विचार हे विद्यार्थ्याने आत्मसात करून सावित्रीबाईंच्या शिक्षण चळवळीला जतन करावे त्याचबरोबर पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीचे स्थान अनन्य साधारण आहे आज स्त्री सर्व क्षेत्रात वावरत असून स्त्रीने गगन भरारी मारलेली आहे.भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या स्त्रिया किंवा आकाशात गगनभराने मारणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, द्रौपदी मुर्मू यासारख्या महिलांनी आपल्या स्वकर्तृत्वावर स्त्री मागे नसल्याचे दाखवून दिले हा विचार आजच्या विद्यार्थिनी आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व विकास करून राष्ट्रीय उभारणीसाठी शिक्षण ghevun घेऊन सावित्रीबाईंचे शैक्षणिक सामाजिक शैक्षणिक विचार जतन करावेत. असे म्हणाल्या.
प्रास्ताविक डॉ. ए.के. कांबळे यांनी केले.
अध्यक्ष भाषणात प्र प्राचार्य डॉ. व्ही.आर पाटील यांनी महात्मा फुले आणि सावित्री फुले यांच्या विचारांची आज गरज असल्याचे सांगून आजच्या महिला वर्गाने सक्षम बनवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे.सदर कार्यक्रमाचे
लैंगिक छळ प्रतिबंधक विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनुजा दत्तात्रय लोहार या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ आर.डी. कांबळे प्रा.चेतन कणसे प्रा.सरिता शिवनगेकर प्रा. शहापूरकर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागाचे प्रमुख प्राध्यापक सेवक कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
आभार प्रा. सी. के जाधव यांनी मांडले
