शिनोळी येथे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ
ग्रामविकासातून सामाजिक समृद्धीकडे वाटचाल

शिनोळी (ता. चंदगड) :
ग्रामीण भागातील दळणवळण, शेती, शिक्षण व सामाजिक जीवनाशी थेट संबंधित असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास हा गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा कणा ठरत असतो. याच अनुषंगाने शिनोळी येथे १ कोटी २५ लाख रुपये निधीच्या मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता (१ किलोमीटर) या महत्त्वपूर्ण विकासकामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले हे उद्घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाले होते.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या निधीतून हे काम साकार होत असून, शिवसेना नेते प्रभाकर दादा खांडेकर, तालुका प्रमुख कल्लप्पा निवगिरे, युवा नेते प्रताप उर्फ पिणु पाटील व महिला तालुका प्रमुख इंद्रायणी बोकमुरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे विकासकाम प्रत्यक्षात आले आहे.
या रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक सुलभ होणार असून, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाणे सोपे होणार आहे. तसेच आपत्कालीन सेवा, आरोग्य सुविधा आणि गावांतर्गत संपर्क अधिक मजबूत होणार असल्याने सामाजिक जीवनाला चालना मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी उपतालुका प्रमुख नामदेव सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर पाटील, वाहतूक सेना अध्यक्ष सलीम मुल्ला, शिव उद्योग सेना अध्यक्ष सुशांत नौकुडकर, महिला उपतालुका प्रमुख भारती शेडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिनोळी खुर्दचे सरपंच परशराम एल. पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तालुका संघाचे जनरल मॅनेजर एस. वाय. पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सदस्या, सह्याद्री सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब वाय. पाटील, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील, भाजपचे सरचिटणीस प्रताप सूर्यवंशी, माजी सरपंच व पंच भरमा वैजु पाटील, निंगाप्पा भा. पाटील, भाजपचे राजेंद्र जो. मन्नोळकर, यल्लप्पा खांडेकर, प्रशांत ग. पाटील, माजी उपसरपंच गुंडुराव रा. करटे, कामगार युनियनचे अध्यक्ष कृष्णा भा. पाटील, ईराप्पा क. पाटील, रामालिंग पाटील, सुरेश कोकितकर, बाळासाहेब खांडेकर, दुर्गाराम कोकितकर, राजू किटवाकर, प्रकाश बोकमुरकर, उमेश पाटील, वैजनाथ पाटील, लक्ष्मण के. खांडेकर, जोतीबा पाटील, बाळासाहेब नाईक, संभाजी बिर्जे, परशराम ओऊळकर, बाबु तरवाळ, पांडुरंग कोकितकर यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रभाकर खांडेकर म्हणाले की, विकास हा केवळ रस्ते व इमारतींपुरता मर्यादित नसून तो माणसाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा असतो. सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून शाश्वत विकासाची दिशा ठरवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची घोडदौड प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन गावागावात विकासाची गंगा आणूया आणि प्रत्येक गाव समृद्ध करूया, असे आवाहन त्यांनी केले.



