५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री राम विद्यालय व व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालय, कोवाडचे उज्ज्वल यश
५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री राम विद्यालय व व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालय, कोवाडचे उज्ज्वल यश

कोवाड : प्रतिनिधि
सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कालकुंद्री येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री राम विद्यालय व श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालय, कोवाडच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
इयत्ता ६ वी ते ८ वी (विद्यार्थी उपकरण गट) मध्ये “Wind Mobile Charger” या अभिनव उपकरणाच्या सादरीकरणासाठी
कु. रसिका गुरुप्रसाद तेली व कु. आराध्या अनंत भोगण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच ९ वी ते १२ वी (विद्यार्थी उपकरण गट) मध्ये “अतिभार सूचक यंत्र” या उपक्रमासाठी
कु. रश्मी विजय पाटील व समीक्षा अमोल बागिलगेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
इयत्ता ६ वी ते ८ वी (दिव्यांग गट) मध्ये
कुमार सार्थक गौतम कांबळे याने प्रथम क्रमांक मिळवून विशेष कौतुकास्पद यश संपादन केले.
याशिवाय माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साधन गट मध्ये
मार्गदर्शक शिक्षक ए. एम. भोगण यांनी उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल सहभाग नोंदवला, तर
अनंत मनोहर भोगण यांनी द्वितीय क्रमांक मिळवून शिक्षकवर्गाचा सन्मान वाढवला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे
दि किणी कर्यात शिक्षण मंडळ, कोवाडचे अध्यक्ष अशोकराव देसाई, सचिव विरसिंग भोसले, खजिनदार तेजस्विनी भोसले, सहसचिव राहुल देसाई, सर्व संचालक मंडळ व शालेय समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
तसेच श्री राम विद्यालय, कोवाडचे
प्राचार्य एस. टी. कदम, उपप्राचार्य एस. एम. माने, पर्यवेक्षक व्ही. बी. व्हन्याळकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे कोवाड परिसरात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभिमानाने उल्लेख होत आहे.



