
कोवाड प्रतिनिधी
: शिकारीचे सापळे लावताना चिंचणे कामेवाडीतील जंगलात सौंदती तालुक्यातील दोघांना पाटणे वनविभागाच्या गस्त घालणाऱ्या पथकाने रंगेहाथ पकडले. बसाप्पा निंगाप्पा देवरमणी (वय ५०) व सुरेश बसाप्पा देवरमणी, (वय २५) दोघेही राहणार बुदनूर, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव यांना ताब्यात घेतले. हे वन्यप्राण्यांची शिकारी करण्याच्या उद्देशाने सापळे लावत असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून लावलेली ७ सापळे ७, कोयता व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केले. सोमवारी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना तीन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई वनक्षेत्रपाल शितल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जॉन्सन डिसोजा, नेताजी धामणकर, वनरक्षक साक्षी सपकाळ, पुनम मदने, देवेश्वर रावळेवाड, सागर पाटील, खंडू कोरे, अलका लोखंडे व कर्मचाऱ्यांनी केली.




