राजकारण

खालसा कोळींद्रे येथे अंधश्रद्धेचा प्रकार; शाळेच्या आवारात वस्तू ठेवून करणीचा संशय, ग्रामस्थांमध्ये संताप

खालसा कोळींद्रे येथे अंधश्रद्धेचा प्रकार; शाळेच्या आवारात वस्तू ठेवून करणीचा संशय, ग्रामस्थांमध्ये संताप

खालसा कोळींद्रे येथे अंधश्रद्धेचा प्रकार; शाळेच्या आवारात वस्तू ठेवून करणीचा संशय, ग्रामस्थांमध्ये संताप

चंदगड : तालुक्यातील खालसा कोळींद्रे येथील मराठी विद्यामंदिरच्या आवारात अज्ञात व्यक्तीकडून अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही वस्तू ठेवून करणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर शाळेत एकीकडे कुतूहल तर दुसरीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक भगवान वाघ व देवा पावरा यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासणीनंतर हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी याची माहिती गावचे सरपंच सचिन देसाई यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली असून शाळेच्या आवारात असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, ज्या शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचारसरणीचे धडे देत अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे शिक्षण दिले जाते, त्याच शाळेच्या परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गावातील सामाजिक कार्यकर्ते बळवंत पाटील यांनी  या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. “अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा कृत्यांपासून समाजाने दूर राहिले पाहिजे. नागरिकांनी विवेकबुद्धीने विचार करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रकरणी संबंधितांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच शाळा परिसरात पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button