राष्ट्रीय

राजगोळी खुर्द येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 301 वी जयंती उत्साहात साजरी; गुणवंत विद्यार्थ्यांसह भजनी कलाकारांचा सत्कार

राजगोळी खुर्द / प्रतिनिधी :
ता. चंदगड जि. कोल्हापूर येथील राजगोळी खुर्द गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 301 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच भजनी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम विश्वकर्मा मंडळ व कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सुनंदा कडोलकर या होत्या.
यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष तानाजी कुराडे, जिल्हाध्यक्ष संतोष चिकोडीकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष परशुराम लोहार, विश्वकर्मा मंडळाचे अध्यक्ष सदानंद सुतार, रघुनाथ सुतार, कोनापा सुतार, ज्यानबा सुतार, विनायक लोहार, विठ्ठल लोहार, दत्तू लोहार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. आलिया हारूनअहमद मंगसुळी हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
गोपाळ कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राघवेंद्र इनामदार यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button