राष्ट्रीय

प्रयोगशीलतेतून विज्ञाननिष्ठ पिढी घडते – सुनीत चंद्रमणी

प्रयोगशीलतेतून विज्ञाननिष्ठ पिढी घडते – सुनीत चंद्रमणी

प्रयोगशीलतेतून विज्ञाननिष्ठ पिढी घडते – सुनीत चंद्रमणी

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्य महोत्सव उत्साहात; भाषण व नाट्य स्पर्धेतील विजेत्यांची जिल्हास्तरावर निवड
चंदगड : पंचायत समिती शिक्षण विभाग, चंदगड यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्य महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, संकल्पना तसेच नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी यांनी मार्गदर्शन करताना, “प्रश्न विचारण्याची वृत्ती, जिज्ञासा आणि प्रयोगशीलता यांतूनच विज्ञाननिष्ठ पिढी घडते,” असे प्रतिपादन केले. अंधश्रद्धा, अफवा व चुकीच्या माहितीपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या विज्ञान मेळाव्यातील भाषण स्पर्धेत कु. ज्योत्स्ना जोतीबा जोशीलकर (श्रीराम विद्यालय, कोवाड) हिने प्रथम क्रमांक, तर कु. गार्गी राजाराम गावडे (धनंजय विद्यालय, नागनवाडी) हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच विज्ञान नाट्योत्सवात दि. न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. या तिन्ही यशस्वी स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विज्ञान मेळावा व नाट्य महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकता, निरीक्षणशक्ती, प्रयोगशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कलागुणांना व्यासपीठ मिळाले. परीक्षक म्हणून प्रा. व्ही बी. गावडे, एम. वाय. माळकरी व रवींद्र देसाई यांनी काम पाहिले. यावेळी अनंत भोगण, पी. वाय. ढेरे, नेहा पाटील व सचिन शिलवंत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार शरद हदगल यांनी मानले.
जिल्हास्तरासाठी निवड झालेल्या यशस्वी स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button