भारतमाता पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात भव्य इमारतीचा संकल्प*
सर्वसाधारण सभा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, संस्थेच्या विकासाला नवी दिशा

*भारतमाता पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात भव्य इमारतीचा संकल्प*
सर्वसाधारण सभा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, संस्थेच्या विकासाला नवी दिशा
कोवाड : प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कोवाड येथील प्रतिष्ठित भारतमाता व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., किणी-कोवाड या संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत आगामी काळातील विकासाची दिशा निश्चित करण्यात आली. संस्थेचे चालू वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने हा रौप्यमहोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याबरोबरच कोवाड येथे संस्थेची भव्य इमारत उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बी. एल. हनुरकर सर होते. संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन व्हाईस चेअरमन शिवाजी खुदाजी पाटील यांनी केले. आर्थिक पत्रकाचे वाचन कार्यकारी संचालक एम. एन. पाटील यांनी केले, तर तज्ज्ञ संचालक रमेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी संस्थेच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजासह गेल्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि कर्मचारी वर्गाच्या योगदानातून संस्थेने गेल्या २५ वर्षांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या शर्वरी सचिन पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत पाल्यांमधून सेजल महेश मंडलिक (आमरोळी) हिने द्वितीय, सानिका सुभाष पाटील (कालकुंद्री) हिने तृतीय, तर ओंकार परशुराम पाटील (कोवाड) याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविल्याबद्दल रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
रौप्यमहोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय
संस्थेचे हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे औचित्य साधून रौप्यमहोत्सव विविध उपक्रमांनी भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच कोवाड येथे संस्थेची भव्य इमारत उभारण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आगामी काळात संस्थेच्या विकासाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संचालक व सभासदांची उपस्थिती
सभेस संचालक एस. बी. नागरदळेकर, दयानंद पाटील, कृष्णा नांदवडेकर, विष्णू पाटील, श्रीधर पाटील, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, गावडू बागीलगेकर, राजाराम जाधव, सोमनाथ पवार, संजय कांबळे, सौ. शोभा पाटील, सौ. सीमा राजगोळकर यांच्यासह शिनोळी शाखेच्या सल्लागार मंडळातील विजय भांदुर्गे, रमेश मसुरकर, दिलीप पाटील, भरमा औऊळकर, महादेव बोडके, शिवाजी पाटील, सुनील पाटील, मुकुंद भाटे, दीपक कुराडे, बाळू मोरे, भाऊ पाटील, वाकोबा पाटील तसेच व्यवस्थापक मारुती कांबळे आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीत सभासदांचा विश्वास आणि सहकार्य मिळवत भारतमाता पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात भव्य इमारत उभारण्याचा घेतलेला निर्णय संस्थेच्या आगामी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. उत्स्फूर्त सभासद उपस्थितीत आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.




