राष्ट्रीय

विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी चन्नेटी–कामेवाडी मार्गे कोवाड बससेवा आजपासून सुरू!*

विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी चन्नेटी–कामेवाडी मार्गे कोवाड बससेवा आजपासून सुरू!*

*विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी चन्नेटी–कामेवाडी मार्गे कोवाड बससेवा आजपासून सुरू!*

चन्नेटी व कामेवाडी परिसरातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांची दैनंदिन प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे.

आमदार श्री. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या प्रयत्नांतून चन्नेटी–कामेवाडी मार्गे कोवाड बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.

या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना कोवाड येथे दैनंदिन कामांसाठी ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.

ही बससेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button