क्रीडा

पाटणे येथे ८ नोव्हेंबरला भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

प्रथम क्रमांकासाठी २५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक; ६० किलो वजनी गटात रंगणार कबड्डीचा थरार

पाटणे, ता. चंदगड : दिवाळीच्या निमित्ताने पाटणे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे हिंदवी स्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य ६० किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा छत्रपती शहाजी हायस्कूल, पाटणे येथे सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

ग्रामीण भागातील कबड्डी खेळाला प्रोत्साहन देणे, खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मातीतील पारंपरिक खेळाची संस्कृती जपणे, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. या स्पर्धेमुळे कबड्डीप्रेमींना चुरशीच्या लढतींचा आनंद घेता येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेची प्रवेश फी २ हजार १०० रुपये आहे.

इच्छुक संघांनी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करावी. ऑनलाइन नोंदणीसाठी https://tinyurl.com/HindaviSwarajyaRegistration या लिंकचा वापर करता येईल.

अधिक माहितीसाठी ऋतिक हिंडगावकर (९५४५१८४२९७), रविंद्र घुल्ले (८८०५२४३४५५), शुभम मल्हारी (९१६८२२४५३०) आणि दर्शक देवळी (८८०६८४८२९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजक मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

कबड्डीप्रेमी, खेळाडू आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदवी स्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, पाटणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button