ऐरोलीत ‘ELDERTHON 2026 – तू चाल पुढे’ उत्साहात; ज्येष्ठांच्या आरोग्य-जागरासाठी प्रेरणादायी पाऊल
ऐरोलीत ‘ELDERTHON 2026 – तू चाल पुढे’ उत्साहात; ज्येष्ठांच्या आरोग्य-जागरासाठी प्रेरणादायी पाऊल

🏃♂️ ऐरोलीत ‘ELDERTHON 2026 – तू चाल पुढे’ उत्साहात; ज्येष्ठांच्या आरोग्य-जागरासाठी प्रेरणादायी पाऊल
नवी मुंबई : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, श्री गणेशा डीआरएस फाउंडेशन आणि We Before Me यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ELDERTHON 2026 – “तू चाल पुढे” (वर्ष तिसरे) ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची ३ किमी चालण्याची स्पर्धा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी इच्छापूर्ती गणेश मंदिर, सेक्टर-१५, ऐरोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

स्पर्धेतील प्रत्येक सहभागीला टी-शर्ट, टोपी, मेडल व नाश्ता देण्यात आला. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहणार असलेले शिवाजीराव पाटील (चंदगड विधानसभा) वैद्यकीय कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत उपक्रमास पाठिंबा दर्शविला.
कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर भा. श्री. कृष्णा पाटील, बीएमसीचे मुख्य अभियंता मा. श्री. चंद्रकांत उंडगे, ऐरोली येथील नगरसेवक मा. श्री. अशोक पाटील, मा. श्री. शिवाजी खोपडे, मा. श्री. अंकुश सोनावणे, कु. ऐश्वर्या सोनवणे, समाजसेवक मा. श्री. सुदर्शन जिरगे, मा. श्री. निलेश बाणखेले (उपशहर प्रमुख, मनसे), मा. श्री. राजू पाटील, मा. श्री. अनिल नकते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या भव्य उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एल. भादवणकर, कार्याध्यक्ष श्री. विशाल पाटील, सचिव श्री. प्रकाश तेजम, खजिनदार श्री. रणधीर पाटील तसेच सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि सक्रिय सभासदांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध व प्रभावी नियोजन श्री. सौरभ केडिया यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एल. भादवणकर यांनी सर्व स्पर्धक व स्वयंसेवकांचे आभार मानत, त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच हा उपक्रम यशस्वी झाल्याचे नमूद केले. भविष्यातही अशाच एकजुटीने सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वर्षभर विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेच्या पुढाकारामुळे आणि श्री गणेशा डीआरएस फाउंडेशन व We Before Me यांच्या सहकार्यामुळे ELDERTHON हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता समाजासाठी प्रेरणादायी चळवळ ठरला आहे.
या संस्मरणीय कार्यक्रमाबद्दल स्पर्धक व नागरिकांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.




