डिजिटल मीडिया चंदगड तालुका अध्यक्षपदी निवृत्ती हरकारे यांची निवड
डिजिटल मीडिया चंदगड तालुका अध्यक्षपदी निवृत्ती हरकारे यांची निवड

चंदगड प्रतिनिधी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या राज्य कार्यकारिणीच्या रविवारी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीत चंदगड तालुका अध्यक्षपदी R K न्यूज चॅनलचे संपादक निवृत्ती हरकारे यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते निवृत्ती हरकारे यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी नूतन राज्य संघटक दीपक मांगले, शहाणूर मुल्ला, बाबासाहेब मुल्ला, रुपेश मऱ्यापगोळ, प्रकाश ऐनापुरे, सुरेश खोत, शिवकुमार संसदी, अशोक मोहिते यांच्यासह गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवृत्ती हरकारे यांच्या निवडीमुळे चंदगड तालुक्यातील डिजिटल माध्यमांना बळकटी मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




