तावरेवाडी येथे मंगाईदेवी मंदिराच्या वर्धापन दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
तावरेवाडी येथे मंगाईदेवी मंदिराच्या वर्धापन दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चंदगड /प्रतिनिधी
तावरेवाडी ता.चंदगड येथील जागृत देवस्थान श्री.मंगाईदेवी मंदिराचा अकरावा वर्धापन दिन मंगळवार दि.२४ फेब्रुवारी ते शुक्रवार २६ फेब्रुवारी अखेर ह.भ. प. डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या अधिपत्याखाली व पुरोहित राजेश कुलकर्णी यांच्या मंत्रघोषत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमा निमीत्त भजन,कीर्तन,दिंडी व महाप्रसाद आसे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामधे मंगळवारी सकाळी . शेवंता व लक्ष्मण भरमु आवडण यांच्या हस्ते मुहूर्त मेढ करण्यात येणार आहे.
तर संध्याकाळी हभप नंदकुमार गावडे (तुर्केवाडी) यांचे प्रवचन व रात्री फलटण येथील अमोल महाराज सूळ यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी सकाळी उपासना व शिवाजी रामचंद्र पाटील यांच्या हस्ते मूर्ती अभिषेक व धार्मिक विधी संपन्न होणार संध्याकाळी हभप डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व आथनी येथील तुकाराम महाराज हजारे यांचे कीर्तन होणारं आहे.तर
गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी मुर्ती अभिषेक व धर्मीक विधी, दिंडी,गंगा पुजन व यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. व रात्री सांगोला येथील संदीप मोहिते व अतुल हातेकर यांच्या भारुडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन श्रवण सुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अहवान मंदीर कमिटी व ग्रामस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.




