आमचे नेते आमदार शिवाजी पाटील यांची लढाई शेतकऱ्यांच्या हितासाठी….त्यांची लढाई गोकुळच्या दुधाची ‘मलई’ खाण्यासाठी: रविंद्र बांदिवडेकर*
पराभवाने खचणारे आणि विचलीत होणारे भाजपाचे कार्यकर्ते नाहीत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सारख्या अनेक पराभवानंतरही भाजपचा कार्यकर्ता संघर्षासाठी सक्षम आहे*

*आमचे नेते आमदार शिवाजी पाटील यांची लढाई शेतकऱ्यांच्या हितासाठी….त्यांची लढाई गोकुळच्या दुधाची ‘मलई’ खाण्यासाठी: रविंद्र बांदिवडेकर*
*पराभवाने खचणारे आणि विचलीत होणारे भाजपाचे कार्यकर्ते नाहीत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सारख्या अनेक पराभवानंतरही भाजपचा कार्यकर्ता संघर्षासाठी सक्षम आहे*
• आमचे नेते आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांची लढाई ही गोकुळच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु आहे. बोगस दुध संस्थांमुळे प्रामाणिक दुध संस्था आणि सभासद यांचे महत्त्व संपणार आहे. बोगस संस्थांच्या आधारे मंत्री मुश्रीफ साहेबांना गोकुळवर कायमस्वरुपी आपलीच सत्ता ठेवायची आहे का ?
• आमचे नेते आमदार शिवाजी पाटील यांचा हा लढा गोकुळमध्ये चेअरमन पद, संचालक पद मिळावे किंवा केडीसी मध्ये चेअरमन पद मिळावे यासाठी नसून त्यांचा लढा हा प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी, दुध उत्पादक सभासदांसाठी आहे. मुश्रीफ साहेब एवढंच प्रामाणिकपणे काम करत आहेत तर त्यांना बोगस संस्था वाढवण्याची गरज का पडली ?
• आदरणीय मुश्रीफ साहेबांची ही खटपट जर खरंच शेतकरी हितासाठी सुरु आहे तर त्यांनी गोकुळच्या चेअरमनपदी एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला संधी द्यावी. त्यांच्या कुटुंबात व त्यांच्या नातेवाईकांकडे ४० पेक्षा जास्त ठराव आहेत असं समजत आहे, यापैकी त्यांच्या किती नातेवाईकांना म्हैंशीची धार काढता येते ? किती नातेवाईक गाई, म्हैंशी सांभाळतात, शेती करतात ? हे सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांना माहित आहे. कष्टाने दुध गोळा करायला आमचा शेतकरी आणि या दुधाची ‘मलई’ खायला मुश्रीफ साहेब आणि त्यांचे नातेवाईक हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीच पटणार नाही.
• गोकुळचा भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की गोकुळच्या उत्पादनांचा दर्जाही दिवसेंदिवस खालावत चालला आहे. गोकुळच्या दुधाला साई सुध्दा आता येत नाही. ग्राहकवर्ग नाराज होत चालला आहे. त्यामुळे गोकुळचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी आता आम्हीं वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहोत.
• लवकरच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हा लढा आम्हीं उभारणार असून यासाठी आवश्यक पाऊले भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही उचलणार असल्याचे पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.




