राष्ट्रीय

एम. जी. सोलर’ दालनाचा उद्या भव्य उद्घाटन समारंभ

एम. जी. सोलर' दालनाचा उद्या भव्य उद्घाटन समारंभ

एम. जी. सोलर’ दालनाचा उद्या भव्य उद्घाटन समारंभ
​कोवाड : प्रतिनिधी
किणी-कोवाड (ता. चंदगड) येथील बस स्टँड परिसरात ‘एम. जी. सोलर’ या नूतन दालनाचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
​या दालनाचे उदघाटन वडील माजी केंद्रप्रमुख हाजी आप्पासो गोरेसो मुल्ला व आई हाजी जन्नतबी आप्पासो मुल्ला यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
​’एम. जी. सोलर’च्या माध्यमातून चंदगड व परिसरातील ग्राहक, शेतकरी तसेच व्यावसायिकांना दर्जेदार सोलर सिस्टीमची विक्री आणि तत्पर विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणी टाटा पॉवर सोलारूफ अदानी सोलर, वारी, ल्युमिनस, सर्व्होटेक आणि यूटीएल सोलर यांसारख्या देशातील प्रमुख नामांकित कंपन्यांची उत्पादने एकाच छताखाली ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
​या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी, मित्रपरिवाराने आणि ग्राहकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजक अमजद मुल्ला, अबिदअली मंगसुळी, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button