कोवाड येथे २९ जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर
कोवाड येथे २९ जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर

कोवाड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोवाड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आरोग्य सहाय्यता कक्ष, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात विविध आजारांचे निदान, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मोफत औषधोपचार व आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबिरात नेत्र, हृदयविकार, ईसीजी, मधुमेह, कर्करोग, कान-नाक-घसा तसेच बालरोग व त्वचारोग आदी विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध राहणार आहे. शिबिराची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० अशी असून, नागरिकांनी आधार कार्ड, शिधापत्रिका किंवा जुने वैद्यकीय कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन पंचायत समिती सदस्या सुर्वंणा कुंभार तसेच भाजप आघाडी कायकर्त्यांनी केले आहे.