
राजेश पर्व…..समाधानी जनतेचा मोहरलेला झरा..
राजेश पाटील….ध्येयासक्तीने भारावलेला पहाड. चंदगडी रांगड्या मनातील अभेद किल्ला. निश्चिततेचा, आश्वासकतेचा ठाम विश्वास. भविष्याचे दृढनिश्चल शक्तीपीठ. उद्याची पहाट. एक दृष्टा राजकारणी माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील.
राजेश पाटील म्हणजे समाधानी तृप्त आणि स्वाभिमानी जनतेच्या ह्रदयातील मोहरलेला पाझर….
राजेश पाटील हे उचलं नेतृत्व नव्हे. लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करणा-या चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते स्व. नरसिंगराव पाटील यांचा मुलगा. तर सासरे लोकनेते कै सदाशिवराव मंडलिक यांच्या मुशीतून ताऊन-सलाखून बाहेर पडलेलं एक खणखणीत नाणं. म्हणून ते या त्सुनामीतही पाय घट्ट रोवून उभे आहे.
राजेश पाटलांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच त्यानी तत्वांचे आणि व्यवहारवादाचे पालन केले आहे.
तालुक्याच्या शिक्षण आणि सहकारात त्यानी घट्टपणे रोवलेले पाय हे याचीच साक्ष देतं. शेतीप्रधान तालुक्यातील शेतक-यांच्या कळा त्याना चांगल्याच माहीत आहे.
आपला कार्यकर्ता हीच आपली इस्टेट समजणा-या राजेश पाटलांनी तब्बल सोळाशे कोटी रुपयांची विकासगंगा आणली.
प्रत्येक गावातील कार्यकर्त्याशी त्यांची जवळीक हे त्यांचं बीज भांडवल आहे.
वडीलांचा स्पष्ट बोलण्याचा गुण त्यांनी तंतोतंत अंगिकारला आहे. सुसंकृत राजकारणी अशी त्यांची ओळख आहे आणि कार्यकर्त्यांनाही ते हेच धडे देतात. प्रसंगी कानपिचक्या देऊन वठणीवरही आणतात.
सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त करणारे प्रश्न यांना स्वस्थ बसू देत नाहीत.
त्यांच्या अंतरंगातील डोह सहज उमलून येत नाही. कधी विजयाचा उन्माद नाही तर कधी पराभवानं खचणं नाही.
जनतेच्या प्रश्नांवर परिणाभाची पर्वा न करतात व्यवस्थेशी भिडणं हा त्यांचा स्थायीभाव आहे.
कार्यकर्त्यांची मजबूत फळी बांधणं आणि टिकवून ठेवणं हे आजकालच्या राजकारणात सोपी गोष्ट नाही, परंतु यांची वीण इतकी पक्की आहे की कुठलीच प्रलोभणं यांच्या कार्यकर्त्यांना चलबिचल करत नाहीत.
कोणाच्या बारश्यात जाऊन बोलू नये पढ स्वभावाला औषध नसतं. असो. यानिमित्तानं एक अपेक्षा व्यक्त करतो. जेन झी नं दिल्लीत धडक दिली आहे. दिवस बदललेत. सहकारातून एखादा इथेनाॅल प्रकल्प, काजु-मुरटा वाइन प्रकल्प, रताळी-नाचणी प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न व्हावेत व यातून तालुक्यातील दोन हजार युवकांच्या हाताला काम द्या. तुम्ही हे करु शकता, तुमच्यात ही धमक आहे म्हणून तुमच्या प्रकट दिनी या भाबड्या अपेक्षा….
पांडुरंग जाधव
कोवाड




