कोवाड येथे श्री गणेश गृहतारण सहकारी संस्थेचे भव्य उद्घाटन*
कोवाड येथे श्री गणेश गृहतारण सहकारी संस्थेचे भव्य उद्घाटन*

*कोवाड येथे श्री गणेश गृहतारण सहकारी संस्थेचे भव्य उद्घाटन*
कोवाड, दि. २ सप्टेंबर २०२६ :
कोवाड येथे श्री गणेश गृहतारण सहकारी संस्था मर्या., कोवाड या संस्थेचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवारी (दि. २) उत्साहात पार पडला. *श्री सुरगीश्वर संस्थान मठ, नूल येथील प. प. श्री. गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी* यांच्या शुभहस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.संस्थेने सभासद व नागरिकांच्या आर्थिक व गृहविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष *श्री. वाय. बी. पाटील* (सहकार तज्ञ) अध्यक्षस्थानी होते. संस्थापक चेअरमन श्री. *व्हि.एन. देसाई* यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमात प्रथम ठेवीदार सुधाकर देसाई यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास विरूपाक्ष गणाचारी, जि. प.सदस्य मानसी भोगण, प.स.सदस्य सुवर्णा कुंभार, लक्ष्मण कडोलकर, वसंत जोशीलकर, राजीव जाधव,शाहू फर्नांडिस शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र श्री. अविनाश मते, गुलाब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री गणेश गृहतारण सहकारी संस्थेच्या वाटचालीस *शुभेच्छा* दिल्या.
कार्यक्रमास कोवाड परिसरातील नागरिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* संचालक विक्रम पेडणेकर यांनी केले तर *आभार* रामा व्हन्याळकर यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संचालक व कर्मचाऱ्यांनी केले.




