राष्ट्रीय

लक्ष्मी नगर तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात

लक्ष्मी नगर तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात

लक्ष्मी नगर तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात
नेत्र, दात, हाडे तपासणीसह शुगर व बीपी तपासणीचा नागरिकांना लाभ
कोवाड : प्रतिनिधी
लक्ष्मी नगर तरुण मंडळ, कोवाड (वडाखालचा राजा) यांच्यातर्फे बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील अनेक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन घेतले.
शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दातांची तपासणी, हाडांची तपासणी, शुगर व बीपी तपासणी तसेच नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला. या आरोग्य शिबिरासाठी बेळगाव येथून डॉक्टर व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.
लक्ष्मी नगर तरुण मंडळाचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षीपासून मंडळातर्फे गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता मंडळाने सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले आहे.
मंडळातर्फे झिम्मा-फुगडी, हरिपाठ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे मंडळाच्या विविध कार्यक्रमांमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती राहिली आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याच्या मंडळाच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले. नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक कार्याची सुरुवात केल्याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button