कोवाड येथे अंबिका मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन
कोवाड येथे अंबिका मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन





कोवाड (ता. चंदगड) येथे अंबिका मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन शनिवारी (३१ जानेवारी) कागणीचे पोलीस पाटील अमृतराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या क्लिनिकची स्थापना डॉ. डी. जी. देसाई (कागणी) यांनी केली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. डी. जी. देसाई यांचे वडील गुंडोपंत देसाई (गुरुजी) म्हणाले, "गावाकडे अजूनही आरोग्याच्या सोयीसुविधा मर्यादित आहेत. मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. याच पार्श्वभूमीवर आम्ही हे क्लिनिक सुरू केले असून, त्यामुळे कोवाड व परिसरातील लोकांना जवळच चांगली वैद्यकीय सेवा मिळेल."
कार्यक्रमाला माजी तंटामुक्त अध्यक्ष अशोक शहापुरक, विलास देसाई, पत्रकार बाबासाहेब मुल्ला, अशोक सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. देसाई यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागात अशा वैद्यकीय सेवांची नितांत आवश्यकता असल्याने अंबिका मल्टीस्पेशालिटी क्लिनिक भविष्यात अधिकाधिक लोकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.