लवकरच सीमाभागात उपमुख्यमंत्री सहायता निधीद्वारे गरजू रुग्णांना मदत चालू होणार.

Total Views : 466
Zoom In Zoom Out Read Later Print

लवकरच सीमाभागात उपमुख्यमंत्री सहायता निधीद्वारे गरजू रुग्णांना मदत चालू होणार.

लवकरच सीमाभागात उपमुख्यमंत्री सहायता निधीद्वारे गरजू रुग्णांना मदत चालू होणार. - श्री मंगेश चिवटे उपमुख्यमंत्री विशेष अधिकारी व उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख.


 मुंबई येथे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व श्री मंगेश चिवटे यांच भेट घेऊन सीमा भागातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी संबंधित चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान श्री चिवटे यांनी येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरुवात होईल व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मदत सुद्धा चालू करण्यासाठी वाटचाल चालू आहे अशी माहिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री माननीय श्री शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष चे अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्याचबरोबर श्री मंगेश चिवटे यांना त्या कक्षाचे राज्य प्रमुख म्हणून सुद्धा अधिकृत घोषणा करण्यात आली. येणाऱ्या थोड्याच दिवसात सीमा भागातील 865 गावांना सुद्धा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे . त्याकरिता पुन्हा एकदा मुंबईला येऊन त्याची सविस्तर कागदोपत्री माहिती घेण्यास सांगितले आणि ती माहिती आम्ही प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिवसात प्रसिद्ध करू.

या भेटीदरम्यान सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री आनंद आपटेकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी राजेश, लोहार उपस्थित होते.

See More

Latest Photos