तावरेवाडी येथे मंगाई देवी मंदिराचा दहावा वर्धापनदिन कार्यक्रम

Total Views : 68
Zoom In Zoom Out Read Later Print

तावरेवाडी येथे मंगाई देवी मंदिराचा दहावा वर्धापनदिन कार्यक्रम

चंदगड /प्रतिनिधी 

   तावरेवाडी ता. चंदगड येथील ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री मंगाई देवी मंदिराचा दहावा वर्धापन दिन कार्यक्रम शुक्रवार ७ मार्च ते रविवार ९मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

  ह.भ.प. डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या आधीपत्याखाली व पुरोहित राजेश कुलकर्णी व सहकारी यांच्या मंत्रघोशात संपन्न होणार आहे.

  शुक्रवार ७ मार्च रोजी सरपंच उज्वला व विष्णु कुद्रेमानकर यांच्या हस्ते मुहूर्तमेढ व ८मार्च रोजी सुरेखा व दत्तात्रय धोंडिबा पाटील यांच्या हस्ते मूर्ती अभिषेक व धार्मिक विधी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

 या कार्यक्रमानिमित्त शुक्रवार ७मार्च रोजी दुपारी हभप तानाजी ऐरणाळकर व सहकारी यांचे संगीत भजन व सायंकाळी हभप उमेश महाराज पावसे यांचे प्रवचन तर रात्री अंतरवाली सराठी येथील हभप महादेव महाराज गिरी यांचे कीर्तन तर शनिवार ८मार्च रोजी महिला दिनानिमित्त पंचक्रोशीतील महिला हरिपाठ व सायंकाळी हभप डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व रात्री नाशिक येथील हभप.अनिल महाराज तुपे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.रविवारी सकाळी हभप निवृत्ती महाराज मुचंडीकर यांच्या हस्ते काला कीर्तन व त्यानंतर पालखी मिरवणूक,गंगा पुजन,महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमानिमित्त भाविकांनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे अहवान मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

See More

Latest Photos