पारगड हेरिटेज रनमधून इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाचा जागर; स्पर्धेचा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*
पारगड हेरिटेज रनमधून इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाचा जागर; स्पर्धेचा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*

*पारगड हेरिटेज रनमधून इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाचा जागर; स्पर्धेचा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*
पारगड, ता. चंदगड : किल्ले पारगडाच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीत आयोजित करण्यात आलेल्या “पारगड हेरिटेज रन” मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला. इतिहास, निसर्ग संवर्धन आणि पर्यटन विकास यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाला महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले की, “पारगड हेरिटेज रन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास, चंदगड तालुक्याची निसर्गसंपदा आणि ग्रामीण भागातील पर्यटन क्षमता देशासमोर मांडणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागात अशा दर्जेदार स्पर्धेचे आयोजन करणे हे मोठे आव्हान असून ते यशस्वीपणे पार पाडणाऱ्या आऊटप्ले स्पोर्ट्स टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करावे लागेल.”
“एक धाव निसर्ग संवर्धनासाठी” हा स्पर्धेचा संदेश अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीची गरज अधोरेखित केली. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये आरोग्य, साहस आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या स्पर्धकांनी पारगडची निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी स्थानिक युवक-युवतींनीही मोठ्या संख्येने अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. पारगडासह चंदगड मतदारसंघातील गड-किल्ले, निसर्गसंपदा आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर आणण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, साहसी पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात. यामुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतात. चंदगड तालुक्याचा निसर्ग, इतिहास आणि संस्कृती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
पुढील वर्षी “पारगड हेरिटेज रन” अधिक भव्य स्वरूपात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धा म्हणून आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी या उपक्रमासाठी स्वतःकडून आणि शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
—————————–
पुढील वर्षी पारगड मॅरेथॉनसाठी ११११११ रुपये बक्षीस आणि आयोजनासाठी २५ लाख रुपये निधी देणार: आमदार शिवाजी पाटील
———————————
यावेळी स्टाफ इंडियाचे सीईओ बिपीन चिरमुरे, माजी आमदार राजेश पाटील, प्रकाश बेलावडे, दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावडे, पंचायत समिती सदस्या सुवर्णा कुंभार, तहसीलदार राजेश चव्हाण, तहसीलदार ऋषीकेश शेळके, पोलीस निरीक्षक चौखंड, नगराध्यक्ष सुनिल काणेकर, उपनगराध्यक्ष आयेशा नायकवाडी, उद्योगपती लक्ष्मण गावडे, अशोक पांडव, सुनिल मालुसरे, विशाल बल्लाळ, अभिजीत गुर्बे, अमेय सबनीस, सरपंच तुकाराम सुतार, प्रवीण चिरमुरे, नगरसेवक अबुझर मदार, नगरसेविका शीतल कट्टी, दत्तात्रेय पाटील तसेच पत्रकार, स्पर्धक, शिवप्रेमी, आजी-माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




