राष्ट्रीय

हलकर्णी फाट्यावर ‘हॉटेल न्यू गारवा गार्डन’चा २४ सप्टेंबरला शुभारंभ

फॅमिली रेस्टॉरंट, बार, लॉजिंग व पार्टी हॉलची सुविधा; पेठणकर परिवाराचा नवा उपक्रम*

*हलकर्णी फाट्यावर ‘हॉटेल न्यू गारवा गार्डन’चा २४ सप्टेंबरला शुभारंभ
फॅमिली रेस्टॉरंट, बार, लॉजिंग व पार्टी हॉलची सुविधा; पेठणकर परिवाराचा नवा उपक्रम*

चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथे ‘हॉटेल न्यू गारवा गार्डन’ या नव्या व्यावसायिक उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. बेळगाव–वेंगुर्ला मार्गावर, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर असलेल्या या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी फॅमिली रेस्टॉरंट, बार, लॉजिंग तसेच पार्टी हॉल अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
श्रींच्या कृपाशीर्वादाने व ग्राहकांच्या सदिच्छेने सुरू करण्यात येणाऱ्या या उपक्रमामागे पेडणेकर परिवाराचा पुढाकार आहे. चंदगड तालुक्यातील नागरिक, प्रवासी, व्यावसायिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांना भोजन व निवासाच्या सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने हॉटेलची उभारणी करण्यात आली आहे.
हॉटेलमध्ये फॅमिली रेस्टॉरंट असल्याने कुटुंबासह भोजनासाठी स्वतंत्र व आरामदायी वातावरण उपलब्ध होणार आहे. तसेच लॉजिंगची सुविधा असल्याने बेळगाव–वेंगुर्ला मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठीही हे ठिकाण सोयीचे ठरणार आहे. वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम, स्नेहमेळावे, बैठका तसेच विविध समारंभांसाठी पार्टी हॉलची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या नव्या उपक्रमास शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन संचालक संपत पेडणेकर व परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button