राष्ट्रीय

राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचा ३१ मे रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघ दौरा

विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन • भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद • विकास प्रकल्पांना चालना*

*राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचा ३१ मे रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघ दौरा*

*विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन • भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद • विकास प्रकल्पांना चालना*

📍 चंदगड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मा. ना. माधुरीताई मिसाळ या (नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास विभाग) तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात त्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ करणार असून स्थानिक प्रश्न, विकास आराखडे व आगामी प्रकल्पांचा आढावाही घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे मतदारसंघातील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या दौऱ्यात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शिवाजी पाटील, माजी राज्यमंत्री मा. श्री. भरमुआण्णा पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button