राष्ट्रीय

आमदार शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचा घेतला आढावा .

आमदार शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचा घेतला आढावा .

  1. *आमदार शिवाजीराव पाटील यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचा घेतला आढावा .

    चंदगड प्रतिनिधी: चंदगड मतदारसंघातील पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ईनाम सावर्डे ता.चंदगड येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत हेलिपॅड उभारणी, वन्यप्राण्यांचा वाढता त्रास, भव्य क्रीडा संकुल उभारणी तसेच आयुष हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
    पर्यटनाला चालना देण्यासाठी तालुक्यात हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे बाहेरील पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. तसेच वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
    याचबरोबर युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा मिळाव्यात यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे अशी सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या . आरोग्य सेवांच्या बळकटीसाठी आयुष हॉस्पिटलचे काम वेगाने होणे गरजेचे आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जागेची समस्या निर्माण झाली होती परंतु आमदार पाटील यांनी स्वतःच ४ एकर जागा या आयुष हॉस्पिटलसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यांची ही भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. जनहितार्थ त्यांनी स्वतः ची जमीन देऊन पुन्हा एकदा त्यांनी लोकहितास प्राधान्य दिले.
    ही सर्व विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी आमदार पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
    या बैठकीस प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील, चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण, बी.डी.ओ. वृषाली यादव, चंदगड तालुका भाजपा माजी अध्यक्ष नामदेव पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, चंदगड नगरपंचायत नगराध्यक्ष सुनील काणेकर, चंदगठ शहर भाजपा अध्यक्ष अमेय सबनीस, अंकुश गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राजु मुल्ला, आरोग्य अधिकारी डॉ. हासुरे, वनाधिकारी तुषार गायकवाड व सौ. शितल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमुळे चंदगड तालुक्यातील विकासकामांना निश्चितच गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button