राष्ट्रीय

कोवाड मध्ये स्वर्गीय अजित दादा यांची जयंती साजरी

कोवाड मध्ये स्वर्गीय अजित दादा यांची जयंती साजरी

कोवाड मध्ये स्वर्गीय अजित दादा यांची जयंती साजरी
कोवाड ‘प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंती सप्ताहाची सुरुवात आज कोवाड येथील वाल्मिकी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. माणगाव जि.प सदस्या कु. मानसी कल्लापाण्णा भोगण यांच्या प्रेरणेतून माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव वाय. बी. पाटील होते.माजी आमदार राजेश पाटील होते.
यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले,चंदगड तालुक्यात मी सोळाशे कोटीचा विकास करू शकलो ते केवळ आणि केवळ अजित दादा पवार यांच्यामुळे अजित दादांचे या चंदगड मतदारसंघावर संघावर अत्यंत प्रेम होते त्यांच्या प्रेमातूनच या मतदार संघाचा कायापालट करू शकलो.पण आज आमचे दुर्दैव आहे ज्या उमेदीने त्यांचा वाढदिवस साजरा करायचा त्या ठिकाणी आज त्यांची जयंती साजरी करावी लागते आहे. अजित दादांच्या अचानक जान्याने तालुक्याची अपरिमीत अशी हानी झाली आहे. आज जड अंतकरणाने आम्हाला ही जयंती साजरी करावी लागत असून. या आश्रम शाळेला भविष्यात मदत करण्याची ग्वाही दिली.
जि प. सदस्या मानसी भोगण आपल्या भाषणात म्हणाल्या, अजितदादांची जयंती साजरी करण्यासाठी या आश्रम शाळेतील अनाथ मुलांना भेट देऊन त्यांना प्रेरणा देणे हा या मागचा उद्देश होता. या आश्रम शाळेसाठी भविष्यात जे काही मदत करणं शक्य आहे ती मदत मी देण्यासाठी प्रयत्न करीन. यावेळी प्रा. सुखदेव शहापूरकर यानी अजित दादांचे कार्य हे लोकांपुढे आणण्यासाठी आमचे प्रयत्न असून अजितदादांचा जयंती सप्ताह या आठवड्यात वेगवेगळ्या उपक्रमानी आम्ही साजरा करणार आहोत
यावेळी संस्थेचे सचिव वाय बी पाटील यानी आपल्या भावना व्यक्त करताना अजित दादांच्या आठवणीना उजाळा देऊन आश्रम शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री एल. एस. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री कांडगावकर सर, यांनी उपस्थिती यांचे स्वागत केले. यावेळी यशवंत चे चेअरमन विनोद पाटील मॅनेजर सूर्यकांत पाटील श्री एस. एल. पाटील श्री राजीव जाधव श्री पुंडलिक नौकुडकर, नारायण कणुकले, राजू भिंगुडे, पोमाणी पाटील उपस्थित होते.सूत्रसंचालन शिवाजी हुबळे यांनी केले आभार रियाज पटेल यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button